आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Datta Jayanti Celebrated For The First Time In Nrusinhawadi Due To Corona, Datta Jayanti Celebrated Without Devotees For The First Time In Hundreds Of Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:कोरोनामुळे नृसिंहवाडीत प्रथमच दत्त जयंती दिनी शुकशुकाट, शेकडो वर्षात प्रथमच भक्तांविना दत्त जयंती साजरी

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

दत्त जयंती म्हणजे दत्त भक्तांच्या आनंदाला उधाण. महाराष्ट्रातील दत्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मात्र आज दत्त जयंती दिनी शुकशुकाट पसरला होता. शेकडो वर्षात प्रथमच भक्तांविना दत्त जयंती साजरी झाली.कोरोनामुळे नृसिंहवाडी येथील दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला होता. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त लाखो भाविक नृसिंहवाडीला येत असतात, मात्र नेहमी भक्तांच्या गर्दीने गजबजून जाणारा कृष्णाकाठ आज शांत होता. गावकऱ्यांनी कोरोनामुळे भाविकांना प्रवेश बंदी केली होती. सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. मंदिरात दत्त जयंतीचे सर्व पूजा विधी संपन्न झाले.

दत्तात्रेयांची राजधानी म्हणून नृसिंहवाडीला ओळख आहे. याठिकाणी दत्ताच्या मनोहर पादुका आहेत. दत्त जयंतीला भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार्या दत्त राजधानी, पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागतात. मात्र यावर्षी नृसिंहवाडीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. भक्तांना जरी यंदा नृसिंहवाडीला येता येत नसले तर दत्त जयंती निमित्त मंदिर परंपरागत सजवून विधिवत सर्वच पूजा पार पडल्या. .

सर्व व्यवहार ठप्प

नृसिंहवाडी हे पेढे आणि बासुंदी साठी सुद्धा प्रसिध्द आहे. दत्त दर्शन घेतल्यानंतर भाविक पेढे आणि बासुंदी खरेदी करण्यासाठी देखील गर्दी करत असतात मात्र व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवहार यावर्षी बंद ठेवले. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून नृसिंहवाडी येथे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...