आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर कोरोना:सरकारी रुग्णालयातील बेडच्या प्रतिक्षेत कोरोना बाधिताचा अखेर मृत्यू

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज शेकडो पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही अपुरी पडत आहेत. त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. सीपीआरमध्ये ( जिल्हा सरकारी रुग्णालय) कोरोना बाधित रुग्णाला बेड न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोल्हापूर शहराजवळच असलेल्या गांधीनगर या व्यापारीपेठेला कोरोनाचा विळखा पडला आहे. गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचे नातेवाईक गुरुवारी रात्री रुग्णांला घेऊन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु तेथील वैद्यकीय सरकारने बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून संबंधित रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी बराचवेळ सीपीआर मधील अधिकारी कर्मचारी यांच्याकडे उपचार करण्याची विनंती केली. मात्र संबंधित कर्मचार्यांनी बेडच शिल्लक नाहीत तर आम्ही काय करु शकतो असा सवाल उपस्थित केला. परिणामी हवालदिल होवून रुग्णाला घेऊन नातेवाईकांनी घर गाठले. पण, पहाटेच्या सुमारास उपचाराविनाच त्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सीपीआरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार होतात मात्र सध्या बेड कमी पडत आहेत अशा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी आणताना पूर्वकल्पना दिलेली नसावी त्यामुळे बेड उपलब्ध करणे शक्य झाले नसावे असा खुलासा सीपीआर प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. 

- बेड अभावी होताहेत रुग्णांचे हाल. - जिल्हा रुग्णालयात 200 बेड कोरोना बाधितांवर उपचारासाठी राखिव - तरीही 272 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

- नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करून घेणे मुश्कील