आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत दोन अपघातात 8 ठार:दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू; कार-कंटेनरच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी सोडले प्राण

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली येथे झालेल्या दोन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावात झाला. येथे 4 तरुण दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होते. त्यांची दुचाकी खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत कार कंटेनरवर आदळल्यामुळे पाच जण ठार झाले.

गावावर शोककळा

दुचाकी अपघातात मृत्यू झालेले चारही तरुण मित्र असून, ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. सोमवारी पहाटे एकत्र झालेल्या तीन मित्रांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हे चार मित्र एकाच दुचाकीवरुन जात होते. दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन बिरनाल नाल्याजवळील खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात अजित भोसले (22) यांचा जागीच मृत्यू झाला तर मोहित तोरवे (21) आणि राजेंद्र भाले (22) यांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. चौथा मित्र संग्राम तोरवे (16) हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार कंटेनरवर आदळली

दुसरा अपघात रविवारी रात्री उशिरा सांगली जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर झाला. येथे कार आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील कासेगाव परिसरातील येवलवाडी फाट्याजवळ ही कार पुण्याहून कोल्हापुरातील जयसिंगपूरकडे जात होती. तेव्हा ती समोरुन येणाऱ्या कंटेनरवर आदळली आणि तिचे मोठे नुकसान झाले.

कटर मशिनचा वापर

कारमधील अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अरिंजय शिरोटे (35), स्मिता शिरोटे (38), पूर्वा शिरोटे (14), सुनेषा शिरोटे (10) आणि वीरू शिरोटे (4) अशी मृतांची नावे आहेत. अरिंजय शिरोटे हे जयसिंगपूर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अपघात इतका भीषण होता की, मृतदेह काढण्यासाठी चक्क कटर मशीन बोलवावी लागली.

बातम्या आणखी आहेत...