आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:शेतकऱ्यांना तातडीने 25 हजारांची मदत जाहीर करा, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • रयत क्रांती संघटनेकडून राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट शेतात बांधावर जाऊन लक्षवेधी आंदोलन केले. गडहिंग्लज तालुक्यात तारेवाडी येथे झालेल्या यावेळी ते बोलत होते.

रयत क्रांती संघटनेकडून आज राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तारेवाडीमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि रयतक्राती संघटनेचे नेते ते सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली.

यावेळी खोत म्हणाले, पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे. गतसाली महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, त्यांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करून, तातडीची २५ हजारांची मदत द्यावी अशी मागणी केली. पाऊस झाल्यानंतर आज आठ दिवसांनी पंचनामे केले जात आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ दहा दिवस लागतील तोपर्यंत भातपीकाला कोंब येईल. मग शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.