आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वांद्र्याच्या गजर....ऐटबाज फेटे बांधुन हातात पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक घेऊन असलेली लहान मुले मुली...महिला भगिनी आणि हत्तीवर बसून आपल्या बाबांच्या घरी निघालेली चिमुकली 'तीर्था'.... लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील चावरे गावच्या दिपक महाडिक यांनी तिची चक्क हत्तीवरुन मिरवणूक काढली.
महाडिक कुटुंबाने केलेल्या लेकीच्या स्वागताची चर्चा सध्या घराघरात सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदान चाचणीच प्रकरण समोर आले होते. पण याच पन्हाळा तालुक्यातल्या चावरे गावात एक आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला. चावरे गावातली चिमुकल्या तीर्थाचे स्वागत तिच्या वडील आणि आजोबांनी चक्क हत्तीवरून केलं दीपक महाडिक आणि दीपिका महाडिक या दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झालं, दीपिका या बाळंतपणानंतर माहेरी होत्या पण ज्यावेळी त्या चिमुकल्या तीर्था सोबत आपल्या सासरी म्हणजे चावरे गावी परतल्या त्यावेळी त्यांचं स्वागत जंगी करण्यात आले.
तीर्थाची गावातून हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली यासोबतच गावातील शाळकरी मुलांनी पर्यावरण वाचवा असा संदेश देत तीर्थाच्या स्वागता बद्दल भव्य अशी रॅली ही काढली. आजही नकोशी किंवा मुलगी नको ही मानसिकता समाजात पाहायला मिळते पण तीर्थाच हे स्वागत म्हणजे नक्कीच समाजातील एक वेगळेपण म्हणावे लागेल दरम्यान ढोल ताशे, मिरवणूक, हत्ती हे सगळं पाहून चिमुकली तीर्थही भारावुन गेली होती. तीर्थाचे आजोबा गावात सर्वांना साखर पेढे वाटत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.