आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा तालुक्यातील नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये नागठाणेच्या महिलेची प्रसूती करताना बाळ दगावल्याचा आरोप हॉस्पिटल प्रशासनावर केला होता. सततच्या पाठपुराव्याने अखेर त्या हॉस्पिटलच्या डॉ. विकास घाडगे याच्यासह चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने डॉ. विकास घाडगे व डॉ. मेघा घाडगे यांना न्यायालयीन कोठडी, तर इतर दोघांना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार, पीडित महिला नीलम बेंद्रे या प्रसूतीकाळात सुरुवातीपासून घाडगे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. दरम्यान, त्या नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर डॉ. विकास घाडगेंऐवजी कंपाउंडर नीलेश घाडगेने पीडिता बेंद्रे यांना मागच्या दाराने ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात परिचारिका कोमल गायकवाडच्या मदतीने प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बाळाचा मृत्यू झाला. योग्य उपचार झाले असते तर बाळ वाचले असते. याबाबत त्यांनी तेथील डॉक्टरांना विचारणा केली होती. तेव्हा डॉक्टरांनी नीलम बेंद्रे आणि तिच्या पतीलाही धमकी दिली. त्यानंतर बेंद्रे बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेल्या असताना पोलिसांनी हीन वागणूक दिल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
नगरसेवकाने केली महिलेला मदत बेंद्रे यांनी आपली आपबीती मीरा-भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांच्याकडे व्यक्ती केली. त्यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांना भेटून घटना सांगितली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या अहवालाबाबत शंका उपस्थित केली. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांनी डॉ. विकास घाडगे, डॉ. मेघा घाडगे, कंपाउंडर नीलेश घाडगे आणि नर्स कोमल गायकवाड यांना अटक केल्याचे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.