आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची ओवैसींवर टीका:म्हणाले- हरामखोर औरंगजेबाच्या कबरीवर जो जाईल, तो हिंदुचाच नव्हे मुसलमानांचाही अपमान करेल

कोल्हापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओवौसीनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल आहे. हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही, छत्रपती संभाजीराजे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा छळ करणारा हा औरंगजेब नावाचा हरामखोर सुलतान यांच्या कबरीबर जर कोणी जाईल, तर हिंदुचा नाही तर मुसलमानाचाही अपमान करेल. जे देशभक्त आहेत त्यांचा हा अपमान आहे. यावर माफी मागितली पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत ओवैसींवर टीकास्त्र सोडले आहे.

केतकीच्या वक्तव्यावर व्यक्त केली नाराजी

आपन काय भाषा वापतोय, कुणाबद्दल वापरतोय याचे भान प्रत्येकाला असायला हवे. अलीकडे सोशल मिडीयावर बोलताना अतिशय बेतालपणे वक्तव्य केले जाते. यात अगदी खालच्या शब्दांत टीका करण्यात येत आहे. अशा प्रकारचे शब्द कुणीही वापरू नये असे म्हणत भाषेचे भान सर्वांना असायला हवे; सोशल मिडीयावर बोलताना भान बाळगा असे राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

पवारांची कविता जशीच्या तशी ट्विट केली

शरद पवारांनी वक्तव्याचा विपऱ्यांस केल्याचे म्हटले होते, यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने ट्विट केलेला व्हिडिओत काहीच कटछाट करण्यात न आल्याचे म्हणत. मिडीयाने जशी क्लिप दाखवली तशीच क्लिप आम्ही पोस्ट केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...