आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:...तर मग देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पडायची वाट बघावी - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक राहू द्या; किमान दुषने तरी देऊ नका - मुश्रीफ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात महाराष्ट्रातील सरकार आम्ही पाडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा करतात. तर मग फडणवीसांना माझा सल्ला आहे, की शांत राहून त्यांनी सरकार पडायची तर वाट बघावी, अशी टीका ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक राहू द्या; किमान दुषने तरी देऊ नका - मुश्रीफ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर लाइव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना भारतीय जनता पार्टी मात्र त्यांना दुषने देत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक राहू द्या; किमान दुषने तरी देऊ नका, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवे होते

मुश्रीफ म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच जगातील 210 हून अधिक राष्ट्रांसह भारतातही कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाला. अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना, एवढ्या कमी वेळेत कोरोनासारख्या या जागतिक महामारीवर विजय दृष्टिक्षेपात आणला असताना खरंतर आजच्या वाढदिवशी दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवे होते. परंतु; ते राहिल बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेधच व्यक्त करीत आहोत.