आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:मी पुन्हा येईन म्हटले की येतोच, कसा येतो हे तुम्हाला माहिती; फडणवीसांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्याला कारणही तसेच होते, मी पुन्हा येईन…पुन्हा येईन…अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर व्हावे लागले होते. आणि या वाक्यावरुन विरोधकांनी त्यांची भरपूर खिल्ली उडवली होती.

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचले. गुरुवारी सीमाभागात दौऱ्यावर असताना फडणवीस यांची नरसिंह मंदिराला अचानक भेट देवून देवाचे दर्शनही घेतले. यावेळी त्यांनी निट्टूर येथे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याचठिकाणी बोलताना मी पुन्हा येईन म्हटले की येतोच, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

नरसिंह मंदिरात घेतले दर्शन

बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर फडणवीसांनी नरसिंह मंदिरात दर्शन घेतले.

नेमके काय म्हणाले फडणवीस?

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपले कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो.

राऊतांकडून काॅंग्रेसची दलाली

संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करु नका, याबाबत सांगितले नाही. कारण, ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते, असेही फडणवीस म्हणाले.

संबंधित वृत्त

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना आला वेग...:राहुल नार्वेकरांच्या भेटीला कायदामंत्री; शिंदे राज्यपालांकडे!

शरद पवार यांची राजकीय निवृत्ती, सत्तासंघर्षाबाबत जवळ आलेला निकाल या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला होता. मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अनपेक्षित भेट घेतली, तर कर्नाटकात जाण्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाच्या निमित्ताने सायंकाळी राज्यपाल रमेश बैस यांच्याशी राजभवनावर गुफ्तगू केली. शिंदे गट अपात्र ठरल्यास किंवा राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत आल्यास बैस व नार्वेकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही भेटींना महत्त्व आले आहे. वाचा सविस्तर