आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्पष्टीकरण:कोल्हापुरात महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये होर्डिंग्जवरून राडा, चाहत्यांनी फेटाळले वृत्त

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अज्ञाताकडून रोहित शर्माच्या अभिनंदनाच्या होर्डिंग्जची फाडाफाडी, चाहत्याकडून शिवीगाळ

आयपीएल स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू वेगवेगळ्या टीम मधून खेळत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे देखील गट पडायला सुरुवात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचे चाहत्यांमध्ये वाद झाल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले होते. दरम्यान हे वृत्त खोटे असल्याचे धोनी आणि रोहितच्या चाहत्यांनी म्हटले आहे.

याबाबत दोघांच्या चाहत्यांनी म्हटले की, कुरुंदवाड शहर हे संपुर्ण महाराष्ट्रात एकोप्याचे शहर म्हणून ओळखले जाते. पण अचानक फलक लावल्यामुळे मारहाणीची घटना घडली अशी चुकीची बातमी आली. पण अशी घटना कुठेही घडली नाही हे सिद्ध झाले आहे. अशी निराधार बातमीमुळे अनेक युवकांना त्रास झाला आहे.

कोरोना महामारी, महापूर अशा संकटाचा सामना करण्यासाठी युवक एकत्र येतात

धोनी व रोहित शर्माच्या समर्थकांनी नगरपालिकेतून रीतसर परवाना घेतलेला आहे. तरी काही बातम्यांमुळे युवकांना त्रास झाला हे मान्य आहे. परंतु कोरोना महामारी, महापूर अशा अनेक संकटाच्या वेळी शहरातील हेच युवक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहतात. तसेच अनेक गोष्टीची सामना आपणा सर्वांना एकत्र येवुनच करायचा आहे. कटुता टाळून सर्व युवक या वादावर पडदा टाकत आहेत.