आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Dispute Over Statue Of Chhatrapati Shivaji In Karnataka Settled, Statues Of Five Great Men To Be Erected In One Place Bhumi Pujan Was Done By The Villagers Of Three Villages

वादावर पडदा:कर्नाटकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील वाद निवळला, एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार; तीन गावच्या ग्रामस्थांनी केले भूमीपूजन

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागा निश्चित, तीन गावच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सुरू झालेल्या वादावर आज तेथील ग्रामस्थांनीच सांमजस्याने पडदा टाकला. मणगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी व श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित ठिकाणी आज सर्व ग्रामस्थांनी मिळून आज भूमिपूजन केले.

गेल्या दोन चार दिवसांपासून कर्नाटकसह महाराष्ट्रात मणगुत्ती येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून सुरू झालेल्या वादावर यामुळे पडला आहे. ग्रामस्थांनी भूमिपूजनानंतर वाद मिटल्याचे स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...