आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींचे पत्र:पीएम किसान योजनेसाठी मला अपात्र ठरवा; राजू शेट्टींचे तहसीलदारांना पत्र

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वारंवार सांगूनही त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे नियमितपणे ११ हप्ते जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी यापूर्वी सहा हप्ते परत करून अपात्र ठरवण्याची विनंती केली होती. मात्र, अजूनही त्यांच्या खात्यावर नियमित हप्ते जमा झाले आहेत.

माजी खासदार असल्याने धोरणानुसार अपात्र असूनही किसान सन्मान निधी खात्यावर जमा होत असल्याने शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांची भेट घेत पुन्हा अपात्र करण्यासाठी विनंती केली आहे. शेट्टी यांनी वारंवार सांगूनही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे घातले तरीसुद्धा त्यांचे पैसे येत नाहीत, काय गौडबंगाल आहे कळत नसल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...