आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जिल्हा रुग्णालयातील लाच मागणाऱ्या लिपिकास अटक

कोल्हापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात परिचारिकेकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हुसेनबाशा कादरसाब शेख (४७, सध्या रा. बुरूड गल्ली, कोल्हापूर, मूळ रा. कर्णिकनगर, सोलापूर) असे अटकेतील लाचखोर लिपिकाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (९ मार्च) दुपारी सीपीआरमध्ये करण्यात आली.

माहितीनुसार, तक्रारदार परिचारिकेस पदोन्नती आणि नोकरीतील अन्य शासकीय लाभ मिळवण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अर्ज केला होता. २० दिवसांपूर्वी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल वरिष्ठ लिपिक शेखने तक्रारदार परिचारिकेकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...