आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:डॉक्टरकडून 9 लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कुपवाड येथे दवाखाना चालवणाऱ्या एका डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून नऊ लाखांवर रक्कम उकळणाऱ्या दोघांवर कुपवाड पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरांग दीपक माळी (२३) व जिनय किशोर ठक्कर (२४) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत डॉ.राजेंद्र आनंदराव यादव (५२) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ.राजेंद्र यादव हे शहरातील मुख्य चौकातील विकास सोसायटीच्या गाळ्यात खासगी दवाखाना चालवतात. ते दवाखान्यात असताना दोघे संशयित त्यांच्या कक्षात आले. त्यांनी मारहाण करत ड्रॉवरमधील दोन हजारांची रक्कम काढून घेतली. नंतर डॉ.यादव यांना वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून त्यांच्या घरी नेले. डॉक्टरांच्या घरातून बँकेचे पासबुक घेऊन सांगली शहरातील आपटा पोलिस चौकीजवळील शाखेत नेत बँकेतील नऊ लाख नव्वद हजार रुपये काढण्यास सांगितले.