आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:युपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा; डॉ. प्रणोती संकपाळ, गौरी पुजारी आणि सौरभ व्हटकरने मिळवले घवघवीत यश

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी उज्वल यश संपादन केले आहे. नेर्ली (ता. करवीर) येथील डॉ. प्रणोती संजय संकपाळ, कोल्हापूर शहरातील गौरी नितीन पुजारी आणि सौरभ विजयकुमार व्हटकर या तिघांनी अथक प्रयत्नानंतर यश मिळवले आहे. डॉ. प्रणोतीचे सांगलीतील भारती विद्यापीठातून बीडीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने २०१७ला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर तिने पुन्हा अभ्यासाचे वेळापत्रक बदलले. २०१९ ला झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नातच यश मिळवले. ती ५०१ रँकने उत्तीर्ण झाली.

गौरी पुजारी राजारामपुरीतील रहिवासी असून ती २७५ रँकने उत्तीर्ण झाली आहे. तिसऱ्या प्रयत्नात तिने यश मिळवले आहे. तिचे शालेय शिक्षण उषाराजे गर्ल्स हायस्कूलमधून झाले. तिने जेनेसिस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने बी.ई. मेकॅनिकल् अभ्यासक्रमात८५ टक्के गुण मिळविले. जवाहरनगर येथील सौरभ विजयकुमार व्हटकर याने यूपीएससी सिविल सर्विसेसमध्ये संपूर्ण भारतात 695 वा क्रमांक मिळविला आहे. स्वतः ऑनलाईन रिसोर्सच्या माध्यमातून अभ्यास करून सौरभने यश संपादन केले आहे.