आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:प्रेमाच्या जाळ्यात ओढून डॉक्टरला मागितली 60 लाखांची खंडणी; 2 महिलांना 4 दिवसांची पोलिस कोठडी

सातारा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या हव्यासापोटी महिलेने एका प्रतिष्ठित डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तब्बल ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिला मदत करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तसेच याच प्रकरणातील एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही महिलांना ४ दिवसांची पोलिस कोठडी, तर त्या अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. डॉक्टरला बदनामीची भीती दाखवत महिलेनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.

सातारा शहरातील राजवाडा परिसरात संबंधित डॉक्टर राहतो. या डॉक्टरची खंडणी मागणाऱ्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघे व्हिडिओ कॉलवरून एकमेकांसोबत संपर्क करत होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत अश्लिल व्हिडिओ कॉलिंग सुरू ठेवले होते. प्रत्येकवेळी कॉल झाल्यानंतर संबंधित महिलेने या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट ठेवले होते. हे स्क्रिन शॉट व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने त्या डॉक्टरला तब्बल ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. वारंवार ही महिला त्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन बदनामी करण्याची धमकी देत होती. या तडजोडीअंती ६० लाख रुपये देण्याचे संबंधित डॉक्टरने मान्य केले. त्यानुसार डॉक्टरने पहिला हफ्ता म्हणून १२ लाख रुपये त्या महिलेला दिले होते.

उर्वरित पैशांसाठी महिलेने संबंधित डॉक्टरांच्यामागे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून अखेर डॉक्टरने ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणीची उर्वरित रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...