आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईने उच्चांक गाठला:गॅस दर वाढल्यामुळे महिलांनी गॅस सिलिंडर पंचगंगा नदीत फेकले

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोल्हापुरातील नागरिकसुद्धा आता वैतागून रस्त्यावर उरतले आहेत. सोमवारी पंचगंगा नदीमध्ये महिलांनी गॅस सिलिंडरला फेकून दिली. शिवाय नदीघाटावरच चूल मांडून झुणका-भाकरी बनवल्या. शासनाने सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष देऊन महागाईवर नियंत्रण आणावे, अन्यथा भविष्यात नद्यांमध्ये गॅस सिलिंडरचा खच लागलेला दिसेल, असाही इशारा देण्यात आला.

या वेळी आंदोलक महिलांनीही केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत महागाईवर नियंत्रण आणून पूर्वीप्रमाणे दर करावेत ही मागणी करण्यात आली. एकीकडे धान्य मोफत देऊन दुसरीकडे गॅस दर वाढवले. मग आम्ही धान्य कसे शिजवायचे, असा प्रश्नसुद्धा महिलांनी उपस्थित केला. या वेळी महिला तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...