आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:सातारा जिल्हा बँकेला ईडीने बजावली नोटीस, जरंडेश्वरला कर्जपुरवठ्याची माहिती मागवली

साताराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मागितली आहे. याबाबतची नोटीस नुकतीच बँकेला बजावण्यात आली. यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केला असल्याचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच हा कारखाना ईडीने जप्त केला आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले की, बँकेने जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला आहे. त्यानुसार जरंडेश्वर कारखान्याला बँकेने २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. सध्या ९६.५० कोटी रुपये येणे बाकी आहे. जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्ज प्रकरणात सक्षम पुरावे, जामीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे. ही सर्व माहिती ईडीने मागवली असल्याचे सांगण्यात आले.

नाबार्डचे सात पुरस्कार
कारखान्याला कशासाठी व किती कर्ज पुरवठा केला, त्याची परतफेड नियमित होते का, अशी आणि इतर माहिती ईडीने मागवली आहे. या नोटिसीमुळे नाबार्डचे सर्वोत्कृष्ट बँकेचे सलग सात पुरस्कार मिळवणाऱ्या बँकेलाच नोटीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बँकेचे बहुसंख्य संचालक हे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. कर्जपुरवठा केला तेव्हा आणि आत्ताही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...