आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याभोवती डिसेंबरअखेर ईडीचा फास : भाजप नेते किरीट सोमय्या

सांगली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत सक्तवसुली संचालनालय (ईडी) निश्‍चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले.

मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केले होते. या प्रकरणात आपण आवाज उठवल्यानंतर २०२१ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते स्वत:च्या नावावर करून घेतले आहेत. तसेच मुंबईतील दहिसर परिसरातील आरक्षित जमिनीचा व्यवहारही संशयास्पद असून यामध्ये सुमारे ५५० कोटींचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्यादिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला केला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून केवळ राज्याची लूट करत आहे, असा गंभीर आरोप करत सोमय्या म्हणाले, ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपल्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला आहे. मात्र, मी ठाकरे सरकारातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सज्ज आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या फरार
शिवसेनेने भाजपशी सातत्याने गद्दारी केली आहे. एवढेच नव्हे तर आपले इमानही विकले आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडी लवकरच चौकशी करणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या फरार आहेत. त्यांना कोणाचे अभय आहे त्या शिवसेनेच्या अत्यंत वरिष्ठ नेत्याचे नाव उघड करावे, अशी मागणीही आपण केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला करणार आहोत, अशा नव्या वादाच्या मुद्द्याला किरीट सोमय्या यांनी स्पर्श केला.

दरम्यान, यावर आता सत्ताधारी शिवसेनेकडून नेमके कोण बोलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण केंद्रीय नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे यावरून देखील आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.

परबांची अधिकाऱ्याच्या नावावर ७५० कोटींची मालमत्ता
महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जवळपास कारागृहात पोहोचले आहेत. तर अनिल परब हे कारागृहाच्या दारात उभे आहेत, असे सांगून सोमय्या म्हणाले, परिवहन महामंडळातील बजरंग खरमाडे यांच्या नावावर अनिल परब यांनी ७५० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्याचा तपास सध्या ईडीकडून केला जात आहे. पुणे, बारामती आदी शहरांत ४० हून अधिक जमिनी, कंपन्या, सोन्या-चांदीची दुकाने व एका प्रख्यात टीव्ही ब्रँडची दोन दुकाने अशा विविध घटकांत ही गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...