आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले:कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेसाठी प्रयत्न

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापुरात दाखल झाले. या वेळी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची विमानतळावर भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...