आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:एकनाथ खडसे यांचा गेम झाला; त्यांनी नैतिकता सांगू नये : प्रवीण दरेकर

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोडपाणी करणारा नेता म्हणून एकनाथ खडसे तोंडसुख घेत होते. आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाऊन नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा सल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सातारा येथे खडसे यांना दिला. तसेच खडसे यांचा गेम झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी व शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी दरेकर साताऱ्यात आले होते. त्यांनी जावली तालुक्यातील मेढा व सातारा तालुक्यातील परळीच्या काही भागात पाहणी केली. त्याआधी दरेकर सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसे पक्षात असेपर्यंत पक्षातील आमदार संपर्कात होते ही गोष्ट खरी आहे, परंतु पक्ष सोडल्यानंतर एकही भाजपचा आमदार त्यांच्या संपर्कात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो, असे दरेकर यांनी सांगितले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहूला २५ हजार व बागायती क्षेत्राला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. आज ते मुख्यमंत्री आहेत. ठाकरे वचनाला जागणारे सरकार, वचन पूर्ण करा, अशी कोपरखळी त्यांनी मारली.