आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:नागरी वस्तित घुसून टस्कर हत्तीचा धुमाकूळ; पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील घटना

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हाळोली गावात शनिवारी रात्री टस्कर हत्ती थेट नागरी वस्तीत घुसून धुमाकूळ घातला. हत्तीने भातासह इतर पिकांची प्रचंड नासाडी केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले होते. संयमित झालेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.

रात्री 9 च्या सुमारास कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे ग्रामस्थ बाहेर आले. त्यावेळी गावात नागरी वस्तीत हत्ती घुसल्याचे दिसले. हौशी तरुणांनी मोबाईल वर त्याचे व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. अनेकांनी हत्तीवर मोबाईल टॉर्च पाडली. काही ग्रामस्थांनी वन विभागाला गावात हत्ती घुसल्याची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी तात्काळ गावात दाखल झाले. त्यांनी हत्तीचा भाग काढत हत्तीला जंगलात पिटाळून लावले. परंतु नागरी वस्तीत घुसताना व जंगलात जाताना शेतीसह केळी व इतर पिकांचे हत्तीने प्रचंड नुकसान केले.

या परिसरात हत्तीचा वावर वाढला आहे. परंतू शनिवारी अचानक हत्ती भर वस्तीत घुसल्याने नागरीक घाबरले आहेत. वन विभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.