आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जादूटोणा करण्यात आला आणि त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. ठाकरेंचे विचार त्यामुळेच बदलले आणि त्यांनी युतीचे दरवाजे बंद करत पवारांकडे गेले. शरद पवारांच्या ताब्यात जाणारा सुटत नाही हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार याकउे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे. सकाळी बावनकुळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे ते सत्तारांसारखा वाद ओढून घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सत्तारांचे सुळेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले असून राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर रान माजवले आहे. आक्षेपार्ह विधान प्रकरणी मुख्यमंत्र्यानी सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सत्तार काय म्हणाले होते?
इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ', असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले, यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद राज्यात रंगणार की काय अशी चर्चा आता राजकीसय वर्तुळात सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.