आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस

प्रिया सरीकर | कोल्हापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैधता संपलेले सलाईन दिल्यामुळे तुमचा पेशंट मेला काय? असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले

कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अक्षम्य हलगर्जीपणावरून आता सीपीआर रुग्णालयावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. दरम्यान याप्रकरणी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे मेडिकल सुप्रीडेंट विजय बरगे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगावमधील ७५ वर्षीय महादेव खंदारे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना डॉक्टरांनी ciprofloxacin injection IP हे औषध आणण्यासाठी सांगितले असता, जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना वैधता संपलेले औषध देण्यात आले. खंदारे यांच्या मुलाने आपल्या वडिलांना वैधता संपलेले सलाईन दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र प्रशासनाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. वैधता संपलेले सलाईन दिल्यामुळे तुमचा पेशंट मेला काय? असे धक्कादायक उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. त्यावर संतप्त झालेल्या खंदारे यांच्या मुलाने सीपीआरच्या अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.