आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघाती आरोप:कारखानदारांनी लाखो टन उसाचा काटा मारला : शेट्टी

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सहकारी साखर कारखानदारांनी या वर्षी गळीत झालेल्या उसातील १ कोटी ३२ लाख टन उसाचा काटा मारून चोरी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील ४ हजार ५०० कोटी रुपये दिवसाढवळ्या लंपास केले आहेत. हे कृत्य दरोडा घालण्यासारखे आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील सर्वच साखर कारखाने राजरोसपणे ऊस उत्पादकांच्या एकूण उसातील १० टक्के उसाचा काटा मारतात, असा आरोप करून राजू शेट्टी म्हणाले की, गतवर्षी राज्यात एकूण १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप दाखवण्यात आले आहे. त्यातील १ कोटी ३२ लाख टन उसाच्या वजनाची चोरी झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शासनालाही जीएसटीच्या रूपातील २२९ कोटींचा कर साखरसम्राटांनी बुडवला आहे.

बातम्या आणखी आहेत...