आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या तोयया सीआयडी इन्स्पेक्टर तरुणीला अटक

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे भासवून पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी इन्स्पेक्टर तरुणीला पोलिसांनी तिच्या मामासह तिला अटक केली. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथे घटना घडली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेले दोन-तीन वर्षे तीचे हे कारणामे सुरू असल्याने वरीष्ठ पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.

प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२) व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (वय ३८) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रियांका हिने आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने सत्कार करून घेऊन आपली सीआयडी इन्स्पेक्टर अशी इमेज तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्वास बसला. या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये उकळले.

प्रियांका चव्हाण हिने निळपण येथील प्रतीक्षा प्रकाश साळवी, प्रज्ञा प्रमोद मेंगाने, मंगेश आनंदा चौगले या तिघांना तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यांच्या मध्यस्थीने सीआयडी मध्ये नोकरीला लावतो असे सांगून प्रतीक्षा कडून २७ जुलै पासून रविवारी दि २ ऑगस्ट पर्यंत ५ लाख २५ हजार, प्रज्ञा मेंगाने कडून १लाख ५०हजार, मंगेश चौगलेकडून २ लाख ५० हजार असे नऊ लाख २५ हजार रुपये घेतले होते.

या सर्वांची दहावी,बारावी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे घेऊन प्रतीक्षा हिला सीआयडी कॉन्स्टेबल, तर प्रज्ञा हिला अव्वल कारकून म्हणून अपॉइंटमेंट लेटर आणि बनावट ओळखपत्र दिले. हे पत्र कोणाला दाखवू नये म्हणून तिने सांगितले, हे पत्र जर कोणाला दाखवले किंवा सांगितले तर तुमच्या नोकरीवर पाणी पडू शकते, तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो, मग आयुष्यात कधीही नोकरी लागणार नाही, असेही सांगितले. भितीपोटी सर्वजण गप्प होते. पण नकळत प्रतिक्षाच्या भावाने हे पत्र व्हाट्सअप्पला स्टेटस ठेवले. हे पत्र पोलिसांनी पाहिल्यावर त्याला बोलावून घेतले आणि चौकशी केली असता खरा प्रकार बाहेर पडला. अगदी हुबेहूब बनावट हजरपत्र आणि ओळखपत्र तयार करून ते लिंकद्वारे संबंधित बेरोजगार युवक अथवा युवतीला दिले जाते. हे ओळखपत्र कोणी तयार केले? ही लिंक कोणी तयार केली? याचा तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...