आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकाच आठवड्यात दोन वीर पुत्रांना गमावण्याची वेळ कोल्हापूर जिल्ह्यावर ओढावली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर गेल्या सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शहिद जवान संग्राम पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तान हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्यावर आज (सोमवारी) त्यांच्या गावी वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्वात आधी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते वीर जवान संग्राम पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.राज्य सरकार दोन्ही वीरमरण आलेल्यांना प्रत्येकी एक कोटी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. वीर जवान अमर रहे...च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात होत्या. संग्राम पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.