आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुळाचे सौदे:जादा भावासाठी कोल्हापूर येथील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे पाडले बंद

कोल्हापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर मार्केट यार्डामधील गुळाचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले. गुळाला ३७०० रुपये दर मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत गुळाला दर मिळत नाही तोपर्यंत गूळ सौदे बंद ठेवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जिल्ह्यात यंदा गुऱ्हाळघरे सुरू होऊन दीड महिने झाला; मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये खदखद होती. मंगळवारी सौदा सुरू असताना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सौदे काढण्यास मज्जाव केला. समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी आक्रमक झाले. अखेर चर्चेनंतर कर्नाटकातील गुळाची आवक पूर्णपणे थांबवण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली.

बातम्या आणखी आहेत...