आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना महामारीचा कहर:बापाने पोटच्या गोळ्याला तृतीय पंथीयाला विकले पाच लाखाला

कोल्हापूर8 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • दत्तक पत्र नाही, लाॅकडाउनध्ये नोटरी केल्याचा दावा
  • दहा वर्षांचा मुलगा बापाऐवजी तृतीय पंथीयांकडे रहायला तयार

कोरोनामुळे काम नाही... व्यसनाधीनतेत जीवन बुडालेले...पत्नी आजारी, वयोवृद्ध आई वडील अशात आयुष्याचा आधार असलेल्या पोटच्या गोळ्याला चक्क तृतीय पंथीयांला विकण्याचे कृत्य कोल्हापूरातील एका बापाने केले. दहा वर्षांचे ते चुणचुणीत पोर, बापाच्या त्रासाला जणू कंटाळून गेले होते. आई जवळ नाही, नातेवाईकांचे प्रेम नाही त्यामुळे आज पोलिस ठाण्यात प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलाने बापाचा हात झिडकारून तृतीय पंथीयांचा हात धरला.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या हातचे काम गेले. त्याचप्रमाणे पाटील कुटुंबातही अडचणी आल्या. दिगंबर उर्फ उत्तम जोतिराम पाटील असे मुलगा विकणार्या बापाचे नाव. उत्तम चांदी कारागिर असूनही व्यसनी असल्याने घरगाडा चालवणे त्याला कठिण जात होते. अशातच कोरोनामुळे अनेक महिने हाताला काम नाही.मुलाचा सांभाळ करणेही त्याला कठिण बनले. म्हणून एका तृतीयपंथीला आपल्या दहा वर्षीय शाळकरी मुलग्याला त्याने नोटरीव्दारे दत्तक दिले. हा दत्तक प्रकार तब्बल चार महिन्यानंतर शनिवारी (19 सप्टेंबर) दुपारी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्यामुळे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दत्तक दिलेल्या मुलग्यासह त्यांचे वडील उत्तम पाटील आणि संबंधीत तृतीयपंथीयाला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरु केली.

पोलिस ठाण्यातून समजलेली माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील काटे भोगाव येथील दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील या युवकाचा माजगाव (ता. पन्हाळा) येथील एका युवतीशी 17 वर्षापूर्वी विवाह झाला असून, या दाम्पत्याला दोन मुले आहेत. शहरातील एका चांदी उद्योजकाकडे दिंगबर उर्फ जोतीराम हा चांदी कारागीर म्हणून काम करतो. कामानिमित्त अनेक वर्षांपासून आई-वडीलाच्या समवेत उत्तम कोल्हापूरात राहतो. सध्या तो गंगावेश परिसरातील सावंतवाडा येथे राहत आहे. पत्नीला मानसिक आजाराची लागण झाली.औषध उपचार केले. पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही, मोठा मुलगा स्वतःकडे ठेवून घेवून, त्यांने मनोरुग्ण पत्नी आणि लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी सासरवाडीला पाठविले

याचदरम्यान कोरोना संसर्गजन्य विषाणूची महामारी सुरु झाली. या महामारीमुळे दिंगबर उर्फ उत्तमचे काम बंद झाल्याने त्यांच्या कुटूंबाची वाताहत होवू लागली. त्यामुळे त्यांने आपल्या दहा वर्षाच्या मुलग्याचा सांभाळ करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. शहरातील राजेंद्रनगर रोडवरील साळोखे पार्कमध्ये राहणाऱ्या गजेंद्र गुंजाळ नामक तृत्तीयपंथीयाने मुलग्याला नोटरीव्दारे त्यांने दत्तक घेतले. हा दत्तकाचा कार्यक्रम मे महिन्यात कोरोनाचा लॉकडाऊनमध्ये साळोखे पार्कमध्ये झाला. या दिवसापासून या मुलगा या तृत्तीयपंथीकडे राहत आहे.

अनलॉकमध्ये आपला नातू जावयाने एका तृत्तीयपंथीयाला दिल्याची माहिती उत्तमच्या सासूला समजली.तिने याबाबत जावयाकडे अनेकदा विचारणा केली. पण तो उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. अखेर शनिवारी सकाळी शहरातील एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याच्या मदतीने शहर पोलिस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे यांच्या कडे धाव घेतली. त्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेवून दिंगबर उर्फ उत्तम, संबंधित तृत्तीयपंथासह संबंधीत मुलग्याचा शोध घेवून सर्वांना ताब्यात घेवून चौकशी करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरुन पोलिसांनी या सर्वांचा शोध घेवून त्वरीत ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. सध्या मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मुलाच्या कष्टडीचा निर्णय न्यायालयात होईल...

संबंधित प्रकरणातील मुलाला सध्या चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलाची आई त्याला संभाळण्यास सक्षम नाही, वडील सक्षम नाहीत अशावेळी न्यायालय योग्य तो निर्णय देईल. पण, आज मात्र मुलाने सर्वांसमोर तृतीय पंथीयांकडे राहण्याची तयारी दाखवली असे शहर पोलिस उपाधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...