आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाच्या धास्तीने मृतदेहाची हेळसांड:मुलांना बापाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला सायकल वरून, बेळगाव जिल्ह्यातील एमके हुबळी गावातील घटना

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या भीतीने व अफवेमुळे नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत सहभाग घेण्यास नकार दिला

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची धास्ती खूपच वाढली आहे. त्यापुढे माणुसकीही उरलेली नाही. विशेषत: बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांत ही धास्ती अधिक गडद असल्याचे चित्र आहे. अंत्यसंस्कारासाठी यायला गावकऱ्यांनी केवळ नकारच दिला नाही तर दारे बंद करून घेतली. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावातील मुलांना आपल्या बापाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायकलवरून न्यावा लागला आहे. भरपावसात मृतदेह असा सायकलवरून घेऊन जाण्याची वेळ मुलांवर आली.

70 वर्षीय व्यक्तीचा आजारपणामुळे शनिवारी मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकऱ्यांचे कोरोनाच्या भीतीने व अफवांमुळे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमीत नेला. अगदी नातेवाइकांनीही अंत्ययात्रेत सहभाग घेण्यास नकार दिला. एक दोन जणांनी मृतदेह सायकलवर बांधताना सायकल धरली बस. शेवटी त्याच्या मुलांनी मृतदेह सायकलवर नेत बापावर अंतिम संस्कार केले. यावेळी घरच्या तीन व्यक्ती सोडून स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हते.

दरम्यान यापूर्वी, कित्तूर येथेही रुग्णवाहिकेच्या अभावामुळे एका महिलेने आपल्या पतीचा मृतदेह हातगाडीवरून पाच किलोमीटर अंतरावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास नेला होता

0