आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतमीवर गुन्हा दाखल करा:सातारा न्यायालयाचे आदेश

सातारा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील जनतेला जिच्या नृत्याने वेड लावले ती गौतमी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मात्र, तिच्या अडचणींत वाढ होताना दिसून येत आहे. गौतमी पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश सातारा न्यायालयाने दिला. गौतमी आपल्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत प्रतिभा शेलार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृणाल कुलकर्णी यांनीही गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. या वेळी कुलकर्णी म्हणाल्या होत्या की, कलावंताने आपली मर्यादा राखली पाहिजे, लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन फार वेगळा आहे. मात्र जर कुणी अशा पद्धतीने कृत्य करत असेल, तर दुर्दैवाने एका कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते.

मोठा चाहता वर्ग केला निर्माण : गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते. यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळते. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. गौतमीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...