आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्घटना:कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला पहाटे भीषण आग, येथे 15 अतिगंभीर कोरोना रुग्णांवर सुरू होते उपचार

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये ही आग लागली.

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये ही आग लागली. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. सुदैवाने या कक्षातील 15 रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले. केवळ एका रुग्णाचा हात भाजला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिष्ठाता डाॕ चंद्रकांत मस्के यांनी दिली आहे. दरम्यान आगीत काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

आग लागल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी येथील कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवले. तसेच तातडीने घटनास्थळी महापालिका अग्नाीशामक दलाचा बंब पोहचला अणि तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. पंधरा रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...