आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Five Lakh Devotees Took Online Darshan Of Goddess Mahalakshmi On The First Day Itself; Naman To Lakshmi Mata Through Online Sreesukta Recitation, Participation Of Students From 100 Schools

भक्तीचा ओघ सुरू:पहिल्याच दिवशी पाच लाख भाविकांनी घेतले महालक्ष्मी देवीचे ऑनलाइन दर्शन; ऑनलाइन श्रीसूक्त पठणातून लक्ष्मीमातेला नमन, 100 शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवीला सोन्याचे दागिने अर्पण, सात महिन्यांत 30 लाख 72 हजारांची ऑनलाइन देणगी

या देवी सर्वभूतेषु, शक्तीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:... या देवी सर्वभूतेषु, बुद्धीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... असे देवीमंत्राचे स्वर श्री महालक्ष्मी मंदिरात निनादले. सामूहिक श्रीसूक्त पठणाच्या निमित्ताने निवडक महिलांनी मंदिरातून यामध्ये सहभाग घेतला. तर, १०० शाळांतील विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने पठणात सहभाग घेत कोरोना संकट दूर करण्याकरिता श्री महालक्ष्मी चरणी साकडे घातले.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात आॅनलाइन पद्धतीने सामूहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम झाला.

या वेळी आॅनलाइन पद्धतीने मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, नगरसेवक प्रवीण चोरबोले, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल यांसह अनेक शाळांतील विद्यार्थी व भाविक सहभागी झाले होते. विश्वकर्मा विद्यालयाच्या शिक्षकांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम केला.

‘महाविष्णुस्वरुप दर्शन’ रूपात आजची पूजा

श्रीमहालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशर ऋषींंना महाविष्णुस्वरूपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो व ते महालक्ष्मीला विष्णुस्वरुपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात.पूजा माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.

ऑनलाइन श्रीसूक्त पठणातून लक्ष्मीमातेला नमन, १०० शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

मंदिर बंद असले तरीही भक्तीचा ओघ कायम आहे. गेल्या सात महिन्यात ऑनलाइन देणगीच्या माध्यमातून अंबाबाई चरणी ३० लाख ७२ हजार रुपयांचे दान जमा झाले आहे. तर, नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला रविवारी करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी चरणी भाविकांनी जवळपास १३ तोळे सोन्याचे दागिने अर्पण केले. कोरोना काळात संयम बाळगून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पाच लाख भाविकांनी देवीचे ऑनलाइन दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे.

कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांनी आज देवीला बारा तोळ्यांची ठुशी अर्पण केली. तर अन्य एका भाविकाने ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक अर्पण केले. दरवर्षी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारे मंदिर यंदा सुने आहे.

बातम्या आणखी आहेत...