आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बद्रीनाथ येथे घेऊन जाण्याच्या आमिषाने टूर कंपनीकडून पाच लाखांचा गंडा

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ, बद्रीनाथ येथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवत ५ लाख २९ हजार ४०० रूपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी श्रदश्री रामचंद्र कुंभार (रा. भोसे, ता. मिरज) यांनी विश्राबाग पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन पुण्यातील गुजर यांची इंडिया हॉलिडेज चारधाम टूरवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १७ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान घडला. माहितीनुसार, फिर्यादी कुंभार यांच्यासह १८ महिलांनी प्रत्येकी ३२ हजार रूपये ऑनलाइन पद्धतीने गुजर यांच्या मोबाइलवर भरले होते.

बातम्या आणखी आहेत...