आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औंध दरोडेखोर पलायन प्रकरण:औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिस निलंबित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिस निलंबित करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ही कारवाई केली आहे.

औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून पाच अट्टल दरोडेखोर पळून गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले.

काय घडलं?

औंध पोलीस ठाण्याच्या कोठडीतून सोमवारी पाच दरोडेखोर पळून गेले होते. यातील तिघा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अद्याप दोघे आरोपी फरारी आहेत. तर, फरारी आरोपींचा शोध सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...