आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरात पुराचे पाणी; पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला 'दक्षिणद्वार सोहळा' म्हणतात
  • कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दक्षिणद्वार सोहळा भक्तांविनाच संपन्न झाला

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे म्हणतात. भक्तांसाठी ही पर्वणी असते, यंदा मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दक्षिणद्वार सोहळा भक्तांविनाच संपन्न झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा (कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती) आणि कृष्णा या नद्यांचा संगम श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे झालेला आहे. तसेच या नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे दत्त मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. नदीला पूर आला की त्याचे पाणी मंदिरातील श्रींच्या पादुकांना स्पर्श करून दक्षिणेकडे जाते तो दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी प्रतिवर्षी भक्त मंदिरात जमा होतात. यावर्षी भक्तांविनाच दक्षिणद्वार सोहळा झाला.

जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच धरणांतून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केला. येथील दत्त मंदिरात बुधवारी रात्री साडे आकरा वाजता नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडले, त्यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला. प्रथमच इतक्या वेगाने पाणी पातळी वाढली दोन तासात तीन साडेतीन फुट पाणी वाढले व रात्रीत दक्षिणद्वार सोहळा झाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर धनवडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...