आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा गौरव:ऊर्जा संवर्धनासाठी राज्याला चार पुरस्कार

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी बुधवारी सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार पुरस्कार राज्याला राष्ट्रपती यांनी प्रदान केले. येथील विज्ञान भवनात आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...