आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्रदिनीच चार कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न:कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटना, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

जमिनीच्या वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार कुटुंबांतील सदस्यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. काहीकाळ याठिकाणी तणाव निर्माण झाला. पण, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार , पाचगाव रस्त्यावरील डिव्हिजन सर्वे क्रमांक तीन येथे एकाच प्लॉटच्या उताऱ्यावर तिघांची नावे नोंद झाली आहे. यासाठी पाचगाव ग्रामपंचायत, करवीर तहसील, प्रांत ऑफिसकडे याबाबत तक्रार केली आहे. बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी या चार कुटुंबांतील लोक वारंवार करत आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

सध्या या ठिकाणी एका समाजाच्या इमारत बांधण्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायत आणि तलाठी यांचा आशीर्वाद असल्याचाही आरोपही या कुटुंबीयांनी केला आहे. वारंवार जिल्हा प्रशासनाकडे याबाबत न्याय मागितला असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असे कुटुंबीयातील मारुती भालकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...