आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरज हत्याकांड:आधी दोन मुलांना संपवले मग आई-वडिलांना बोलावून त्यांचाही खून; मिरजमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

सातारा-सांगली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नातेवाइकच असलेल्या आरोपीने चौघांना गुंगीचे औषध देऊन मार्ली घाटात ढकलून दिले

मिरज तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घण हत्या करण्यात आली आहे. यामध्ये आई-वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश होता. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. आरोपीने खून करून डोंगराळ व दुर्गम अशा मार्ली घाटात (जावळी, सातारा) मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले आहे. खून झालेले कुटुंबीय दत्तनगर, बामणोली (मिरज, सांगली) येथील रहिवासी होते. घटनेच्या नेमक्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. तरीही पैशांच्या हव्यासापोटीच हे हत्याकांड झाल्याचा संशय आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तानाजी विठोबा जाधव (55), पत्नी मंदाकिनी जाधव (50), मोठा मुलगा तुषार जाधव (26) आणि छोटा मुलगा विशाल जाधव (20) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील राहणारे होते. खून प्रकरणी योगेश निकम (सोमर्डी, जावळी) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी खून झालेल्या कुटुंबाचा नातेवाईक असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

अशा अवस्थेत सापडले मृतदेह

जावळी तालुक्यातील मार्ली घाटात मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सोमवारी आढळून आले होते. मेढा व सातारा पोलिसांच्या तपासादरम्यान एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणात दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचाही खून झाल्याचे सोमवारी उघड झाले. दाम्पत्यानंतर एका मुलाचाही याच घाटात मृतदेह सापडला असून दुसर्‍या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश निकमने (सोमर्डी, ता. जावळी) या व्यक्तीला ताब्यात घेतले त्यानंतर चौकशीदरम्यान त्यानं खुनाची कबुली दिली.

आधी मुलांना संपवले, मग आई-वडिलांना बोलावले

तुषार व विशाल तानाजी जाधव या मुलांना लष्करात नोकरी लावतो असे आरोपी योगेश निकमने सांगितले होते. त्यानुसार या मुलांना त्याने साताऱ्याला बोलावून घेतले. तिथून त्यांना मार्ली घाटात लष्कराचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे सांगून नेले. तेथे नेल्यानंतर या दोघांना गुंगीचे औषध देवून उंच कड्यावरुन ढकलून दिले. आरोपीने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधला व त्यांनाही मुलांचे ट्रेनिंग सेंटर पाहण्यासाठी सातार्‍याला बोलावून घेतले. तेथून त्यांना मार्ली घाटात नेऊन गुंगीचे औषध देत त्यांचाही या आरोपीने खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser