आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेसोत्सव:कोल्हापूरात 21 फूट ऐवजी 21 इंच उंचीच्या गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना; 97 गावात सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • 500 हून अधिक गावात एक गाव एक गणपती उपक्रम

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विधायक पाऊल उचलले आहे. शहरातील 21 फुट उंचीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करणार्या वीस पेक्षा अधिक मंडळांनी लहान मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल चाळीस वर्षांची परंपरा मोडून यंदा शिवाजी चौकातील मानाच्या 21 फुटी गणेशाच्या जागी 21 इंच उंचीची मूर्ती भक्तांना पहायला मिळणार आहे. तर जिल्ह्यातील 97 गावांनी यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाचशेहून अधिक गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जाणार आहे.

कितीही संकटे आली तरी त्यातून सावरण्यासाठीचे बळ आणि उर्जा देणार्या सण उत्सवांच्या पर्वाला आता सुरुवात होत आहे. कोरोना चे संकट असूनही सोशल डिस्टंस, सॅनिटायझर, मास्क या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी माहोल तयार होवू लागला आहे.

कोल्हापूरला सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. अंबाबाई मंदिरातील सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या भक्त मंडळाच्या गणेशा पासून ते पेठापेठातील मानाच्या गणपतींपर्यंत सर्व मंडळांनी यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव आटोपशीर करण्याचा व मूर्ती लहान बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी तरुण मंडळ चाळीस वर्षांपासून 21 फुट उंचीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करीत आहेत. 2030 सालापर्यंत गणेश मूर्ती देणगीदारांची नोंद मंडळाकडे आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लहान 21 इंच उंचीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांनी सांगितले.

कोल्हापूरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती चार फुट उंचीच्याच राहतील. घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फुट इतकीच ठेवावी, गणेशोत्सव काळात कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील असे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...