आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा परिणाम:बाप्पांच्या गावात यंदा प्रवेशबंदी, प्रवेश केल्यास 500 रुपये दंड, कोल्हापूर जिल्ह्यातील सातवणे ग्रामस्थांचा निर्णय

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सातवणे गाव गेल्या काही वर्षात गणपती बााप्पांचे गाव म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण छोट्याशा या गावात भव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे उभारले जातात. दारादारात सजणारे बाप्पांचे मंडप उत्सवाची उंची वाढवतात. त्यामुळे उत्सवकाळात आसपासच्या गावातील, तालुक्यातील आणि सीमाभागातील नागरीकांचे पर्यटन स्थळ बनलेल्या सातवणेत यंदा मात्र उत्सव काळात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर गावात प्रवेश केल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी उत्सवकाळात लाखों लोक गावास भेट देतात. यंदा खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी बैठक घेऊन प्रवेशबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. गणेशोत्सव काळात गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील केवळ बाराशे लोकवस्ती असलेल्या छोट्या पण टुमदार सातवणे गावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. वैयक्तीक पातळीवर लाखो रूपयांचा खर्च करून भव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे उभारले जातात. प्रथा परंपरा नाही तर केवळ हौस म्हणून या उत्सवाचे स्वरुप विस्तारत गेले. एकाने केले मग दुसऱ्याने असे गावात सुमारे दहा ठिकाणी भव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक सजावटीसह देखावे उभारले जावू लागले. ते बघण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज सह सीमाभाग आणि कोकणातूनही पर्यटक येतात.

उत्सव काळात खास गाड्या करुन, सहकुटुंब नागरीक गावाला भेट देत असत. यावर्षी सार्वजनिक उत्सवाला मर्यादा आल्या. खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीनेही बाहेरच्या गणेश भक्तांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक गणेशभक्तांबरोबरच पर्यटकही नाराज झाले. गणेशभक्तांनी ग्रामस्थांची अडचण समजून घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जो प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे त्याबाबतही समजून घ्यावे असे आवाहन सरपंच रामभाऊ पारसे यांनी केले आहे.