आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाच्या आगमनाची आस:कोरोनाचा वध करणारा गणपती बाप्पा, कोल्हापूरातील कलाकाराने साकारलेली मूर्ती हैदराबादला होणार रवाना

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणूचा वध करणाऱ्या बाप्पाला पसंती

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे मनुष्यहानीबरोबरच अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशा या कठीण परिस्थितीतही सर्वत्र विघ्नहर्त्याच्या आगमनाची आस भक्तांना लागून राहिली आहे. जगावर ओढावलेले हे संकट गणपती बाप्पा तारेल... या आशावादातूनच कोल्हापूरातील एका तरुण मूर्तीकाराने कोरोनाचा वध करणारी श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती गणेशोत्सवासाठी हैदराबादला रवाना होणार आहे. मात्र गणपती बाप्पांचे हे रुप तरुण मंडळांना भावल्याने कोरोना वध करणाऱ्या अशा आणखी मूर्ती इथे तयार झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यावर कोरोना आणि पूरपरिस्थिती असे दुहेरी संकट ओढावले आहे. विशेष म्हणजे इथल्या दोन्ही कुंभार वस्त्या नदीकाठावर वसलेल्या आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याची झळ कुंभार बांधवांनाच प्रथम व सर्वाधिक सोसावी लागते. गणेशोत्सव समिप आल्याने मूर्तीकामाला गती आली असली तरी मूर्तीकारांना महापुराची चिंताही सतावत आहे. मात्र अशातही इथल्या कुंभारवाड्यातून गणेशाची विविध रूपे साकारण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. कुंभार बांधवाचे संपूर्ण कुटुंब त्यासाठी राबत आहे.

आशिष राजेंद्र पाडळकर या मूर्तीकाराने कोरोना विषाणूचा वध करणारी गणेश मूर्ती साकारली आहे. आशिषला विविध रुपी मूर्ती साकारण्याची आवड आहे. यातूनच कोरोना वधाची मूर्ती साकारण्याचे सुचल्याचे त्याने 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगीतले. शासन नियमानुसार गणेश मूर्ती चार फुट उंचीचीच आहे. पण अवकाशातून झेपावून बाप्पा त्रिशूळाने कोरोना वध करीत असल्याचे दर्शविले आहे. गतवर्षी आशिषने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळामध्ये विराजमान गणपती बाप्पाला घेऊन जात आहेत, अशी मूर्ती साकारली होती. यंदा कोरोनाचा वध करणाऱ्या गणेश मूर्तीला पसंती मिळत आहे असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...