आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळ अन् धूर:शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा जंगी कार्यक्रम; खुळ्या पब्लिकवर पोलिसांचा सौम्य लाठीमार

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या पदन्यासाने मंत्रमुग्ध झालेले हजारोंचे पब्लिक. त्यातल्या निम्म्यांनी बसल्या जागी धरलेला ठेका. शिट्ट्यांचा पाऊस. गौतमीच्या नावाचा पुकारा अन् वन्स मोरची साद. जावळी तालुक्यातल्या कुडाळच्या रंगारंग कार्यक्रमाची उभ्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे निमित्तसाधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पब्लिकने तुफान गर्दी केली. यावेळी गौतमीच्या सौंदर्याने खुळ्या झालेल्या प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना चक्क सौम्य लाठीमार करावा लागला.

दोन दिवस आधीच...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 30 मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आधीपासूनच सातारा तालुक्यासह जावळी तालुक्यात रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लावणी नृत्यांगना गौतमी पाटील चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिवेंद्रसिंहराजे थिरकले...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कार्यकर्त्यांनी आग्रह करून स्टेजवर नाचण्याची विनंती केली असता काही वेळासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले.

साडी, चोळीने सन्मान...

कार्यक्रमावेळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा साडी आणि चोळी देऊन आमदार शिवेंद्रराजे यांनी सन्मान देखील केला. कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी चांगला समाचार घेऊन सौम्य लाठी चार्ज देखील केलेला पाहायला मिळाला.