आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळ अन् धूर संगटच:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, स्टेजवर येताच पब्लिक झाली बेफाम; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या पदन्यासाने मंत्रमुग्ध झालेले हजारोंचे पब्लिक. त्यातल्या निम्म्यांनी बसल्या जागी धरलेला ठेका. सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठी गर्दी पाहायला मिळते. आत्तापर्यंत तिचे अनेक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या पंढरपूर येथील कार्यक्रमात राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. हेच पाहता तिचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

अख्खे वेळापूर लोटले

काल पंढरपूरच्या वेळापूर येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अख्खे वेळापूर लोटले होते. तसेच वेळापूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील आणि तालुक्यातुन दुरुनदुरुन लोक या कार्यक्रमासाठी हजर झाले होते.

तुफान शिट्टया

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकातून हुल्लडबाजी सुरू झाली. पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र हुल्लडबाजी सुरूच राहिल्यावर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. गाणे मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. मात्र गौतमी स्टेजवर येताच तुफान शिट्टया सुरु झाल्या. दुसऱ्या गाण्यानंतर पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला. आणि अखेर कार्यक्रम थांबवावा लागला.

सतत राहते वादात

नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे समीकरणच झाले आहे. गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी एक तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मृणाल कुलकर्णी यांनी ही गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत साताऱ्यात तक्रार दाखल केली होती.