आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Gokul's Annual Meeting Started In Chaos As There Were No Chairs For The Opposition To Sit, Aggressive; Shoumika Mahadika's Role In Holding Meetings Outside

गोकुळची वार्षिक सभा गोंधळातच:विरोधकांना बसण्यासाठी खुर्च्या नाही म्हणत शौमिका महाडिकांनी बाहेर सभा घेण्याची भूमिका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापरूच्या गोकुळ या दूध महासंघामधील सत्तातरांनंतर आज पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे. विरोधकांना बसण्यासाठी खुर्च्या नसल्याने सुरूवातीपासूनच आक्रमक झाले आहेत. महाडिक यांनी तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करत गोकुळच्या सभेला हजेरी लावली आहे. महाडिक - पाटील गटाच्या सभासदांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला.

धडाका धडाका, महादेवराव महाडिकांचा धुमधडाका.. वाचवा रे वाचवा, गोकुळ वाचवा अशी घोषणाबाजी करत विरोधी गटाच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी शासकीय विश्राम गृहापासून सभा ठिकाण असलेल्या सैनिक दरबार हॉलपर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शौमिका महाडिक ठराधारकांसह हॉलमध्ये पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी सभासदांनी प्रश्न कसे विचारायचे? त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. विरोधी सभासद येण्याआधीच सभागृह कसे भरले? असा सवाल महाडिक यांनी उपस्थीत केला.

यापूर्वीही गोकुळमध्ये राडा

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गोकुळचे अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूर माजी पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, रुतूराज पाटील यांच्या उपस्थिती आहे. नेहमी प्रमाणेच गोकुळच्या या वार्षिक सभेला प्रचंड गर्दी झाली असून ही देखील सभा वाछळी ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. गोकूळची सभा ही नेहमीच वादळी ठरत असते. या पूर्वी सभेत खुर्च्याची फेकाफेकी, बाटल्या फेकून मारणे, असे प्रकार घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

शौमिका महाडिक कोण?
शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर होत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षपद भूषवले आहे. सध्या गोकुळ संघात त्या महाडिक गटाच्या संचालिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...