आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:मराठा आरक्षणासह प्रलंबित प्रश्नांबाबत 19 ऑगस्टला पुण्यात गोलमेज परिषद, विविध मागण्यांवर सविस्तर विचार करण्यात येणार

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
सुरेश दादा पाटील
 • या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केले जाणार आहे

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत 19 ऑगस्टला पुण्यात गोलमेज परिषद आयोजित केली आहे. परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केले जाणार आहे.

यासंदर्भात मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेशदादा पाटील व मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 58 मूक मोर्चे काढले. राज्यशासनाबरोबर अनेक वेळा बैठका केल्या. त्या माध्यमातून मराठा समाजाचे काही प्रश्न सोडवण्यात यश आले. परंतु काही मागण्या सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. यासाठीच पुण्यात राज्यातील सर्व मराठा समाजातील संघटनांना एकत्र करून गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे.

या प्रमुख मागण्यांसाठी गोलमेज परिषदेत सविस्तर विचार करण्यात येणार आहे

 • परिषदेत मराठा समाजाला मराठा समाजाला 13% व 12% आरक्षण मिळाले आहे. पण सदरचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्या बाबत सरकारची भूमिका व संघर्ष समितीची जबाबदारी धोरण निश्चित करणे.
 • सारथी संस्था सुस्थितीत चालविणेसाठी रुपये ५०० कोटीची आर्थिक तरतूद करावी
 • मराठा आरक्षणा मध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने नोकरी द्यावी
 • महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा विध्यार्थी व विद्यार्थीनींसाठी वसतिगृह उभे करण्यात यावे.
 • शिवस्मारकाचे काम तातडीने लवकरात लवकर चालू करावे
 • मराठा आरक्षण चळवळी मधील ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते सरसकट मागे घ्यावेत
 • कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला रुपये 1000 कोटीची तरतूद करून द्यावी
 • कोपार्डी प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना लवकरात लवकर फाशीवर चढविणे बाबत राज्य शासन काय करणार आहे ते सांगावे
 • मराठा आरक्षण 2014/15 मध्ये (SEBC) मधून परीक्षा झाली, यांना नोकरीचे आदेश मिळाले पण शासनाने रुजू करून घेतले नाही, त्यांना नोकरी वर घेणे बाबत.
 • राज्यातील शेतकरी आत्महत्या करून घेत आहेत. यांच्यासाठी स्वामिनाथन आयोगच्या शिफारसी लागू करणेत याव्यात.
 • गड किल्यांचे संवर्धन करणे साठी रुपये 500 कोटींची तरतूद करण्यात यावी.
0