आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर:पर्यटकांसाठी आनंदाची बातमी.. कास पठारावरील फुलांचा हंगाम उद्यापासून सुरू

सातारा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम या वर्षी तब्बल दहा दिवस उशिराने सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना या वर्षी खुले करण्यात येणार असून ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

चालू वर्षीचा हंगाम हा शनिवार, १० सप्टेंबरपासून सुरू करत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती तसेच वन विभाग सातारा यांच्याकडून देण्यात आलीय. कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी हंगामासाठी साधारणपणे १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते पर्यटकांना मार्गदर्शन करतील. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय.

प्रशासनाकडून जय्यत तयारी सातारा जिल्ह्याची शान असलेल्या कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसांत हे कास पठार आता फुलांनी बहरू लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल, पर्यटनमंत्र्यांचे स्वीय सहायक गौतम पठारे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाच्या अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...