आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगलीतील मिरजमध्ये काल रात्री चार 4 हॉटेल्स पाडण्यात आली. मात्र या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर आरोप केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल करत 4 जेसीबी मशिन जप्त करण्याची कारवाई केली आहे.
बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र हे तोडण्यात आलेले गाळे बेकायदेशीर होते, माझ्या भावाने काहीही चुकीचे काम केलेले नाही, असे स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.
ब्रह्मानंद पडळकरांचा विरोध
सांगलीतील मिरज शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य असलेल्या तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी हे बांधकाम पाडले. मात्र या जागेचा बेकायदेशीरपने ताबा घेण्याच्या उद्देशानेच हे बांधकाम पाडल्याचा दावास येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. आता लोक याप्रकरणी रस्त्यावर उतरली असून ब्रह्मानंद पडळकरांचा विरोध केला जात आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
या पाडलेल्या बांधकामामध्ये रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अश्या सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकरांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, माझ्या भावाच्या नावावर जो प्लॉट आहे त्यावर अतिक्रमण झालेले होते. ते आम्ही काढून घेतले. अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सांगण्यात आले होते की, ही जागा रिकामी करा. पण त्या नागरिकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही, त्यामुळे आम्ही पालिकेला मदत म्हणून हे अतिक्रमण काढून घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.