आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिल:घरगुती वीज बिल सरकारने माफ करावे, अन्यथा राज्य सरकारला शॉक देवू - राजू शेट्टी

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला रोजगार नाही. या काळात ग्राहकांनी जास्त वीज वापरली का नाही? याची खातरजमा न करता, त्यांना वाढीव वीज बिल पाठवले आहे. ही घरगुती वीज बिल सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील ग्राहकांचे विज बिल सरकारने भरावे आणि 100 युनिट पर्यंतचे सर्व ग्राहकांचे बिल माफ करावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. यावेळी शेट्टी बोलत होते. या आंदोलनात प्रताप होगाडे हेही उपस्थित होते यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यातील ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यासाठी राज्य सरकारला साडेतीन हजार कोटींची रक्कम लागणार आहे. ही रक्कम मोठी नाही. आम्ही चंद्र, सुर्य मागत नाही. आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, बाबा पार्टे, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्यासह अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणच्या चर्चेने राजकारण आणि पोलिस प्रशासन ढवळून निघाले आहे.लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या याची आपण चर्चा करणार आहोत की नाही? असा उद्वीग्न सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...