आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादख्खनचा राजा म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानच्या सेवेकरी, पुजारी व भक्तांना कसायला दिलेल्या जमिनी परस्पर विक्री केल्याचे पुढे आले आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच ३०० एकर जमिनीवर हात मारल्याचा संशय समितीने व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जागी झाली असून, ाबाबत तातडीने पडताळणी करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे असलेल्या सुमारे ३ हजार मंदिरांकडे २७ हजार एकर जमीन आहे. यातील बहुसंख्य जमीन पुजारी, सेवक यांच्याकडे कसायला आहे. त्यांचा सात-बारा मात्र मंदिरांच्या नावे आहे.
यामध्ये जोतिबा देवस्थानच्या नावे साधारणतः ३ हजार एकर जमीन आहे. सातारा जिल्ह्यात याचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी मानाच्या सासनकाठीबाबत वाद वाढला. ती काठी ज्यांच्याकडे आहे, त्यांना सेवा खर्च म्हणून मोठ्या प्रमाणात जमिनी कसायला दिल्या आहेत. वारसा जमिनीच्या नोंदी पुरावा म्हणून देण्याची नोटीस देवस्थान समितीने दिली. तेव्हा ४५० पैकी फारच कमी भक्तांनी पुरावे दिले. तेव्हा संशय आल्याने अधिक माहिती घेतली असता अनेकांनी या जमिनी विकल्याचे उघडकीस आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.